Tuesday, 29 April 2014

आवडणाय्रा माणसाच्या पाठी पळायचं नसतं,

आवडणाय्रा माणसाच्या पाठी पळायचं नसतं,
धोका मिळाला म्हणून
चालता चालता थांबायचं नसतं....
जरी पहीलं प्रेम विसरण
जरी शक्य नसतं,
तरी आपली वाट पाहणाय्राचं मन तोडायचं
नसतं,
सोडून जातात ते कायर असतात
असं डोळ्यांवर हात ठेवून नातं जोडायचं नसतं,
प्रेम फक्त मनाने मनावर करायच असतं
कारण प्रेमाच जग कधीच संपत नसतं...
मतलबी लोकांची या
जगात कमी नसते
शरीरावर प्रेम करणाय्राची रांगच असते,
मनाची हाक ऐकणारे कस्तूरीसारखे दूर्मिळ
असते
अशा डोळ्यांमध्ये कधीच वासना नसते...
प्रेमात फक्त प्रेमच नसत
कधी रागवणं
तर कधी रूसणं असतं,
जवळ असताना दूरावणं
नसतं
ती दूर जाताना तळमळणं असत...
मिठीत येता आपोआप
गुलकंद तयार होईल
पण विश्वासाच्या पाकळीला तोडायचं
नसतं...
प्रेम तर रोजच करता येईल
पण एका वळणावर
एकटं सोडून जायचं नसतं,
प्रेम
प्रेम
प्रेम
प्रेम कधी करायच नसतं..
प्रेम फक्त जपायच असतं,.....



K...Raj

brokheart143.blogsoft.com
K...Raj
brokheart143.blogsoft.com

मी ही कुणावर,मनापासून प्रेम केलं होतं











मी ही कुणावर,
मनापासून प्रेम केलं होतं,
तिला ह्रदय काय पैसा काय अडका काय,
जिवनचं माझं दिलं होतं.....

रात्र रात्र जागायचो तिच्यासाठी,
मर मर मरायचो,
तिनेही मी तुझ्यावर खुप प्रेम करते रे,
असं फसवं उत्तर दिलं होतं.....

मी नेहमी खुप खुप,
खुश असायचो तिला पाहून,
असं काही मनं माझं,
तिच्यावर जडलं होतं.....

ती आली आयुष्यात,
जेव्हा माझ्या,
तेव्हा तिच्यासोबत सुखी संसार थाटायचा,
असं मनोमनी ठरवलं होतं.....

ती ही खुप प्रेम,
करायची माझ्यावर,
तिनेही माझ्यासोबतचं जगण्या मरण्याचं,
खोटं वचन दिलं होतं.....

ती सोडून गेली जेव्हा,
मला बरबाद करुन,
तेव्हा मी तिच्यासाठी हस-या डोळ्यांना,
ढसाढसा रडवलं होतं.....

खुप प्रयत्न केले खुप विनवण्या केल्या,
मी तिला समजावण्यासाठी,
तेव्हा असे वाटले जसे मी,
मरणाला एक क्षणासाठी थांबवलं होतं.....

मी तिला गमावलं,
ती माझ्या नशिबात नाही म्हणुन,
पण ???
तीने आयुष्यात ते गमावलं,
जे फक्त आणि फक्त तिच्यासाठीचं देवाने बनवलं होतं..

खरचं अजुनही ती सोडून गेली,
ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही माझा,

कारण ?????

खरचं तिने प्रेम केलं,
होतं का माझ्यावर,
की देवाने टाकलेलं माझ्यासाठी,
कधीचं न सुटणारं कोडं होतं.....

K...Raj 
brokheart.blogsoft.com

काय चुकलं माझे कि,


काय चुकलं माझे कि,
इतकी मोठी शिक्षा दिलीसं....???
स्वप्न रंगवून प्रेमाची,
अर्ध्यावरती सोडून गेलीस...!
नव्हतीच साथ द्यायची,
तर प्रेमाचं नाटक का केलसं....???
मी फक्त तुझा असूनही,
स्वःता पासून परकं केलसं....!
खुप आठवण येते गं तुझी,
का गेलीस मला एकट सोडून....???
माझ्या या सुखी आयुष्याचा दुर्दैवी अंत करुन....!
तुला माहित नाही,
मी रोज तिथे जातो जिथे आपली पहिली भेट झाली होती,
एकत्र जगण्याची खोटी स्वप्ने रंगवली होती....!
तु मात्र तुझं वचण तोडलसं,
प्रेमात मला एकटं सोडलसं....!
पण
मी मात्र माझं वचण अजुणही पाळतोय,
मी आजही फक्त आणि फक्त तुझीच वाट पाहतोय.....!
तुझीच वाट पाहतोय...खरा प्रेम वेडा...

Sunday, 27 April 2014

प्रेमाचे गुंतून धागे,


प्रेमाचे गुंतून धागे,

दूर अशी तू जाऊ नकोस,

मला सुधा मन आहे,

हे तू विसरू नकोस....!!

कितीही रागावलीस तू,

मी तुज्यावर रागावारणार नाही,

कारण तुज्याशिवाय मी कोणावर,

प्रेम करणार नाही.....!!
K...Raj {B}
brokheart143.blogsoft.com

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,

Saturday, 26 April 2014

भेट आपली शेवटची


भेट आपली शेवटची,
हसून निरोप घेत आहे,
वरून शांत असलो तरी,
हृदयातून रडत आहे......
जात आहेस सोडून मला,
नाही अडवणार मी तुला,
असशील तिथे सुखी राहा,
ह्याच माझ्या शुभेच्छा तुला.....
निरोप तुला देतांना,
अश्रू माझे वाहतील,
काळजाच्या तुकड्यांना,
सोबत वाहून नेतील.....
त्या वाहणाऱ्या अश्रुतही,
प्रतिबिंब तुझेच असेल,
नीट निरखून पहा त्यांना,
प्राण त्यात माझा दिसेल.....
वाट आपली दुभंगली,
आता पुन्हा भेटणे नाही,
प्रवास जरी एक आपला,
मार्ग एक होणे नाही.....
आठवण तू ठेवू नकोस,
मी कधीच विसरणार नाही,
भेटणे तुझे अशक्य तरी,
वाट पाहणे सोडणार नाही.....
जातेस पण जातांना,
एवढे सांगून जाशील का ?
भेटलोच जर कधी आपण,
ओळख तरी देशील का ?
जाता जाता थोडे तरी,
मागे वळून पाहशील का ?
प्रत्येक्षात नाही तरी,
डोळ्यांनी काही बोलशील का ?
बोलली नाही तू जरी,
नजर तुझी बोलेल,
गोंधळलेल्या अंत:कर्णाची,
खबर मला सांगेल.....
कोठे तरी हृदयात,
इतिहास सारा आठवशील,
तो आठवण्या पुरता तरी,
तू नक्कीच माझी राहशील.....
नजरेने जरी ओळखलेस तू,
शब्दांनी मी बोलणार नाही,
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती,
वादळ आणणार नाही.....
नेहमीच पराभव झाला तरी,
हक्क तुझ्यावर सांगणार नाही,
पण तुझी शप्पत सांगतो,
पुन्हा प्रेम करणार नाही........
Only One......


Broken Heart...
K...Raj {B}