Monday, 26 May 2014

ती मला म्हणाली एक प्रश्न सारखा माझ्या मनात
येतो रे
मी : कोणता प्रश्न ??
ती : खरं उत्तर देणार असशील तर विचारते
मी : काय गं म्हणजे तुला काय म्हणायचं
मी तुझ्या सोबत खोटे बोलतो
ती : तसे नाही रे पण हा प्रश्न
जरा माझ्यासाठी खास आहे आणि तु दिलेल छानस
उत्तर मला हव आहे
मी : ठिक आहे विचार मग
ती : तु खूप मस्त आहेस तुझं बोलणं तुझं वागणं
माझ्यावर भरभरून प्रेम करणं मी तर खूप
साधी आहे रे अगदी तुझ्या समोर काहीच नाही मग
तु माझ्यात असे काय बघून माझ्यावर प्रेम
केलस ??
मी : एक तिला गोड स्माईल दिले
आणि म्हणालो तुझ्या दिसण्यावर
तुझ्या हसण्यावर तुझ्या गालावर
तुझ्या गुलाबी ओठावर तुझ्या पानेदार डोळ्यावर
तुझ्या रेखीव नाकावर तुझ्या लांबसडक केसांवर
तुझ्या हणूवटी वरील खळीवर तुझ्या मुखातून
येणार्या मधुर शब्दावर
तुझ्या हरणी सारख्या चालेवर तुझ्या आकर्षीत
करणार्या आदानवर तुझ्या चेहर्यावरील
हावभावानवर खरंच सांगायचं तर
या तुझ्या कशावरच मी प्रेम केलं नाही सौंदर्य हे
चिरकाळ टिकत नाही म्हातार पण आलं कि सर्व
विदरूप होतं सौंदर्य आहे तेव्हा तो पर्यंत प्रेम
करणार्यातला मी नाही आणि म्हणून मी फक्त
तुझ्या छातीत
माझ्यासाठी धडधडणार्या त्या तुझ्या ह्रदयावर
प्रेम केलं आहे ते ना काळे ना गोरे ना सुंदर
ना विदरूप ते माझ्यासाठी जिवास जिव देणारं आहे
माझ्या भावनाना समजून घेणारं आहे
माझ्या प्रेमाला हळूवार जपणारं आहे हो मी प्रेम
केलंय तुझ्या स्वभावावर तुझ्या वागण्यावर
तुझ्यात असलेल्या माझ्यावर फक्त
तुझ्या ह्रदयावर आणि म्हणूनच सौंदर्य संपेल पण
माझं प्रेम कधीच संपनार नाही माझं बोलणं ऐकून
तिच्या डोळ्यातुन अश्रू वाहात होते
मी तिला जवळ घेतले अश्रूंचा ओघ कमी झाल्यावर
ती फक्त इतकेच म्हणाली मी या जगातील सर्वात
नशिबवान मुलगी आहे.............

Friday, 16 May 2014

कैसे जिवन दिले देवा, यातना सहन होत नाही,

कैसे जिवन दिले देवा,
यातना सहन होत नाही,
जगावसं ही वाटत नाही,
मरण ही येत नाही.....
कैसे जिवन दिले देवा,
अस्थित्व माझे कुठे दिसत नाही,
आपल्यांची साथ नाही,
परख्यांकडून अपेक्षा नाही.....
कैसे जिवन दिले देवा,
अडखळत राहतो पावलोपावली,
धडपडतो स्वतःच्या सावलीसाठी,
आधार कुणाचा मिळत नाही.....
कैसे जिवन दिले देवा,
जगाची रीत कळत नाही,
प्रियतमेची आस नाही,
जिवलगांची सोबत नाही.....
कैसे जिवन दिले देवा,
स्वप्नांचा आभास नाही,
गाभा-याला उंबरठा नाही,
देवळात देवच नाही.....
कैसे जिवन दिले देवा,
विदूषक होऊन जगावं लागतय,
स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय,
का मी माणुस नाही ???

Tuesday, 13 May 2014

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,

एकदा तरी आयुष्यात कुणी असे
भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व
काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण
सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य
पुन्हा पुन्हा जगावे...
.
एकदा तरी आयुष्यात कुणी असे
भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप
चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप
थकावे,
पण
थकल्यावरही आधारसाठी त्याच्या
पहावे...
.
एकदा तरी आयुष्यात कुणी असे
भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे
असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख
विरुन जावे...

.
एकदा तरी आयुष्यात कुणी असे
भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे
असावे,
त्याच्यासाठी मी जगतच
राहावे,
जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच
आयुष्य संपून जावे...
.
एकदा तरी आयुष्यात कुणी असे
भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक
क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर
पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब
भिजून जावे...
.
एकदा तरी आयुष्यात कुणी असे
भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे
असावे...

प्रेम तुझे नी माझे

प्रेम तुझे नी माझे
खूप दिवस जाले आहेत आता आपले नाते संपून..
अशीच खूप महिने अन वर्ष हि जातील..
पण या आठवणी का संपत नाहीत.
का या आठवणी रोज रोज येत राहतात...
त्या येताना एकट्या हि नाही येत...
येताना अश्रू हि सोबत घेवून येतात ..
विसरली असशील तू मला
अन विचार करत असशील..
मी हि तुला विसरलो असेन
पण खरच मी नाही विसरलो..
रोज त्याच आठवणी जगताना
रोज तेच अश्रू रडताना..
मी खरच नाही कंटाळलो..
हे आयुष तुलाच दिले होते..
आणि तू का अशी वागली
हेच कधी कळले नव्हते..
तू परत नाही येणार हे नक्की आहे..
पण तू आनंदी रहावी हीच इच्छा आहे.....!!!



K....Raj

brokheart143.blogsoft.com

Thursday, 8 May 2014

तुला एकटक पाहीलं की, मला काय होतं,

तुला एकटक पाहीलं की,
मला काय होतं,
काहीच कळत नाही.....
तुझ्याशी बोललो की,
मी का अबोल होतो,
काहीच वळत नाही.....
तुझ्या मिठीत आलो की,
मी का स्वतःला विसरतो,काहीच
उमजत नाही.....
तुझ्यात गुंतलो का,
मी का बेभान होतो,
काहीच समजत नाही.....
तुझ्याडोळ्यात बघितलं की,
मी का तुझ्यात
हरवतो,काहीचउमजत नाही.....
तुझ्याजवळ असलो की,
फक्त तुलाच पहावसं वाटतं,काहीच
दुसरं दिसत नाही.....
तु लाजलीस की,
फक्त तुझ्या ओठांच हसू
बनतो,काहीच जमत नाही.....
मनापासून खरं सांगायच तर,पिल्लू,
जानू,
शोनू,
मला ना,
तुझ्याविणा एक क्षणही करमत
नाही....

Tuesday, 6 May 2014

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!


वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....
इटुकल्या - पिटुकल्या मेसेज मधून
मला वाकुल्या दाखवेल.....
हळूच एखादा MISS CALL करून
मला ती सतावेल.....

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
स्वप्नामध्ये माझ्या हळूच
कोणीतरी शिरेल.....
बोलायला "काहीच नाही" म्हणून फोनवर
तासभर बोलेल....
आणि नेमक महत्वाच बोलताना फोन
ठेवण्याची घाई करेल.....

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
माझ्याही आठवणीत रात्रभर
कोणीतरी जागेल.....
तिच्या विरहाचे चार दिवस चार जन्माचे
अंतर दाखवेल.....
आणि तास-दोन तासांची भेट सुद्धा क्षणभर
वाटेल.....

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल....!
या एकाकी जीवनामध्ये
त्या परीचा प्रेमाचा स्पर्श लाभेल......
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल...

Sunday, 4 May 2014

जाऊ दे, झालं गेलं विसरून जा


जाऊ दे,
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पहा..
.
थांब...
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस....

K...Raj

brokheart143.blogsoft.com

कळलंय मला आज एक सत्य...


कळलंय मला आज एक सत्य...
या मतलबी जगात
कोणीच कोणाच नसतं...
म्हणतात सगळे फक्त की मी आहे तुझ्यासोबत.
पण
शेवटी आपलं आपल्यालाच जगायचं असतं..
प्रेम, काळजी, विश्वास या सगळ्या फक्त
बोलायच्या गोष्टी ...
खरी वेळ आली की हे सगळं सगळं व्यर्थ ठरतं..
स्वतः तला 'स्व' जिंकतो फक्त बाकी सगळं तसं पण
निरर्थकच ठरतं...
खोटं खोटं का होईना पण जे गोड बोलतात
त्यांची हे जग हाजी हाजी करतं...
आणि कुणीतरी जास्त खुष रहावं म्हणून
का असेना जे एखाद्याला आपल्यापासून दूर करतं
त्यांना हे जग यथेच्च निष्ठुर ठरवतं...
हेच जर या पापी जगाचं सूत्र असेल ना तर
हो आहे मी या जगाचा अपराधी...
इच्छा तर माझीच नाहीये आता जगायची... फक्त एवढंच
म्हणणं आहे की ...
तडपवून तडपवून नका मारू या एकट्या जीवाला..

K...Raj 
brokheart143.blogsoft.com